हैदराबाद - कोरोनाने सध्या देशभरात थैमान घातले आहे. काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अशावेळी हैदराबादमध्ये रस्त्यावर थुंकल्यामुळे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्त्यावर थुंकणं पडलं महागात...हैदराबादमध्ये गुन्हा दाखल - गुन्हा दाखल
एमडी घौसुद्दीन असे त्या व्यक्तीचे नाव असून तो जुनी मलकपेठ येथे राहणार आहे. कलम 269 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमडी घौसुद्दीन असे त्या व्यक्तीचे नाव असून तो जुनी मलकपेठ येथे राहणार आहे. कलम 269 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, देशात कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला असून स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात एक व्यक्ती बाहेर रस्त्यावर येत थुंकत असल्याचे एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या फोटोचा शोथ घेत आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.