हैदराबाद - अंबरपेटमधील गोलनाका परिसरातील पर्ल गार्डन मंगल कार्यालयाची भिंत कोसळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यादरम्यान, आठ लोक जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी या मंगल कार्यालयामध्ये लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर आलेले अतिथी हे भोजन करत होते. यावेळी अचानक ही भिंत कोसळली, आणि भिंतीखाली अनेक लोक दबले गेले.
या घटनेमध्ये दोन रिक्षा आणि सहा दुचाकींनादेखील हानी पोहोचली आहे. हैदराबाद महानगरपालिकेचे सुरक्षा पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले, आणि बचावकार्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच या मंगल कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले होते. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महानगरपालिकेने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.
मंगल कार्यालयाची भिंत कोसळून चार ठार.. - हैदराबाद पर्ल गार्डन मंगल कार्यालय
अंबरपेटमधील गोलनाका परिसरातील पर्ल गार्डन मंगल कार्यालयाची भिंत कोसळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी दुपारी या मंगल कार्यालयामध्ये लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर आलेले अतिथी हे भोजन करत होते. यावेळी अचानक ही भिंत कोसळली, आणि भिंतीखाली अनेक लोक दबले गेले.
Hyderabad: Function hall wall collapses, 4 dead
हेही वाचा : ओडिशात अज्ञात आजाराचे सहा बळी..