डेहराडून - चमोली येथे हिमस्खलन झालेल्या दुर्घटनास्थळाचे रिमोट सेंन्सिंग करण्यास गेलेल्या CSIR म्हणजेच कौन्सिंल ऑफ साईन्टिफिक अॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च संस्थेला अपयश आले आहे. उर्जा प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना शोधण्यासाठी आपत्ती निवारण पथक काम करत आहे. मात्र, यामध्ये अनेक अडचणी येत आहेत.
हेलिकॉप्टरद्वारे परिसराची रेकी -
रिमोट सिन्सिंगद्वारे बोगद्यातील माहिती मिळवून दाखवू असा दावा हैदराबाद स्थित CSIR ने केला होता. मात्र, त्यांना बोगद्यातील माहिती मिळवता आली नाही. त्यामुळे सीएआयआरचे पथक हात हलवत माघारी आले. हेलिकॉप्टरमधून रिमोट सेन्सिंग डिव्हाईद्वारे चमोली दुर्घटनास्थळाची वैज्ञानिकांच्या तज्ज्ञ पथकाने पाहणी केली मात्र, त्यांना यात यश आले नाही. त्यामुळे आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढणं किती अवघड असल्याचे दिसून येत आहे.
बचावकार्य करताना अनेक प्रश्न अनुत्तरीत -
CSIR ची टेक्नॉलॉजी ठरली फेल तपोवन आणि ऋषीगंगा उर्जा प्रकल्पातच्या बोगद्यात अनेक कामगार अडकून पडले आहेत. घटना घडून तीन दिवस उलटल्याने कामगार आत जिवंत आहेत की मृत्यू झाला आहे, याचीही माहिती मिळत नाही. सध्या बोगद्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, आतमध्ये किती गाळ आहे? किती कामगार आत अडकलेत? त्यांची स्थिती काय आहे? आत शिरण्याचा मार्ग कोणता अशी सर्व माहिती रिमोट सेन्सिंगद्वारे मिळवता आली असती. मात्र, ही नैसर्गिक आपत्ती इतकी भयंकर आहे की, यापुढे तंत्रज्ञानही कुचकामी ठरत आहे.
रिमोट सेन्सिंग म्हणचे काय ?
रिमोट सेन्सिंग हे असे तंत्रज्ञान आहे ज्यात आकाशातून भूगर्भाची माहिती मिळवली जाते. किरणांचा वापर करून भूर्गावरील आणि भूर्गातील स्थितीचा अभ्यास करून माहिती गोळा केली जाते. जसे की, जमिनीत कोणते खनिज आहे, पाणी कोठे आहे, इंधनाचे साठे कोठे आणि किती प्रमाणात आहेत. एखादा प्रकल्प उभारायचा असेल तर भूगर्भाची रचना कशी आहे? या गोष्टींचा अभ्यास रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानामुळे करण्यात येतो.