हैदराबाद -हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे एन्काऊंटर करण्यात आला आहे. या आरोपींची नावे मोहम्मद आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी होती. त्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. या प्रकरणातील पीडितेचे नाव बदलून 'जस्टिस फॉर दिशा' अशा सूचना सायबराबादचे आयुक्त सज्जनार यांनी दिली होती.
हैदराबाद येथे 27 नोव्हेंबरला महिला डॉक्टरवर बलात्कारनंतर हत्या करून तिला जाळण्यात आले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी अनेक शहरांमध्ये आंदोलने करण्यात आली. पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आता विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती.हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) आता चालणार होता.