हैदराबाद -तेलंगणा येथील बालापूर गणेश लाडवाचा तब्बल १७. ६० लाखांना लिलाव झाला आहे. कोलन रामी रेड्डी यांनी २६ व्या वर्षी हा लाडू खरेदी केला. मागील वर्षी हा लाडू टी. श्रीनिवास गुप्ता यांनी १६. ६० लाखांना खरेदी केला होता.
या वर्षी मागील वर्षापेक्षा एक लाखाने वाढीव किमतीला हा लाडू विकला गेला. या लाडूच्या विक्रीसाठी सकाळी १०.२३ ला लिलाव सुरू झाला. बालापूर गणेश उत्सव समितीने २६ व्या वर्षी या लाडूचा लिलाव करत इतिहास घडवला आहे.