उदयपूर - दारूच्या आहारी गेलेल्या राजस्थानमधील एका तळीरामाने पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. दारू पिण्यासाठी पैसे नव्हते म्हणून या तळीरामाने चक्क पत्नीची मित्राकडे विक्री केली. पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
धक्कादायक..! राजस्थानात दारूसाठी तळीरामाकडून पत्नीची विक्री - alcohol addiction bad effect
पतीच्या मित्राकडून लैंगिक शोषण झाल्याचे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जेव्हा विरोध केला तेव्हा पतीने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो काढले. त्या फोटोवरून ब्लॅकमेल केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.
पतीच्या मित्राकडून लैंगिक शोषण झाल्याचे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जेव्हा विरोध केला तेव्हा पतीने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो काढले. त्या फोटोवरून ब्लॅकमेल केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी नराधम पती आणि त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, देशभरात टाळेबंदी सुरू असून दारू विक्रीला काही अटी घालून परवानगी देण्यात आली आहे. टाळेबंदीत घरगुती हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे.