नवी दिल्ली/नोएडा - दिल्लीला लागूनच असलेल्या ग्रेटर नोएडा येथून तिहेरी तलाकचे हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. ग्रेटर नोएडाच्या दादरी परिसरात ही घटना घडली. पत्नीने पतीकडे बाजी घेण्यासाठी ३० रुपये मागितले. तर, यावर पतीने तिहेरी तलाकचा उच्चार केला. तीन तलाकच्या प्रकरणांवरच केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विधेयक सादर केले होते.
पत्नीने मागितले ३० रुपये, पती रस्त्यातच बोलला... तलाक.! तलाक.! तलाक.! - 30 rupees
पीडित महिला जैनब हिने भाजीसाठी पतीकडे ३० रुपये मागितले होते. यावर पती साबिर याने चिडून तिला जोरदार मारहाण केली. याची माहिती मिळताच पीडित महिलेचे वडील तेथे पोहोचले. ते तिला रुग्णालयात घेऊन निघाले असता साबिरने ३ वेळा तलाकचा उच्चार करत पत्नीला घटस्फोट दिला.
पत्नीने बाजी खरेदी करण्यासाठी पतीकडे ३० रुपये मागितले. त्यावर पतीने चिडून पत्नीला जोरदार मारहाण केली. मारहाणीची माहिती मिळताच पीडित महिलेचे वडील तेथे पोहोचले. त्यांच्यासमोरच पतीने तलाक, तलाक, तलाकचा उच्चार करत पत्नीला घटस्फोट दिला, असा आरोप करण्यात आला आहे. या विवाहितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. जैनब असे या महिलेचे नाव आहे.
महिलेच्या वडिलांनी दिली प्रकरणाची माहिती
पीडित महिला जैनब हिने भाजीसाठी पतीकडे ३० रुपये मागितले होते. यावर पती साबिर याने चिडून तिला जोरदार मारहाण केली. याची माहिती मिळताच पीडित महिलेचे वडील तेथे पोहोचले. ते तिच्यावर उपचार करण्यासाठी तिला रुग्णालयात घेऊन निघाले. तेव्हा साबिर याने ३ वेळा तलाकचा उच्चार करत पत्नीला घटस्फोट दिला.
९ वर्षांपूर्वी झाला होता विवाह
पीडितेच्या आईने जैनब हिचे ९ वर्षांपूर्वी साबिर याच्याशी लग्न झाल्याचे सांगितले. त्यावेळेसही त्यांनी विविध वस्तूंच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात हुंडा दिला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनीच सासरकडच्यांनी आणखी हुंड्याची मागणी केली. तेव्हा महिलेच्या नातेवाईकांनी अधिक हुंडा देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे जैनबला रोज मारहाण केली जात असे. तसेच, जीवे मारण्याचीही धमकी दिली जात असे. महिलेच्या नातेवाईकांनी अनेकदा साबिरच्या घरी पंचायतही भरवली. मात्र, प्रत्येक वेळी साबिर माफी मागून जैनबला सोबत घेऊन जात असे.
साबिरचे वहिनीशीही अनैतिक संबंध
पीडित महिला जैनब हिच्या नातेवाईकांनी साबिर याचे त्याच्या वहिनीशीही अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. याही कारणाने साबिर पत्नीला मारहाण करत असे. तसेच, घटस्फोटाचाही मागणी करत असे.
रस्त्यावरच दिला 'तलाक'
घटनेविषयी बोलताना पीडितेने ती आधीपासून आजारी असल्याचे सांगितले. तिने भाजीसाठी ३० रुपये मागितले, तेव्हा साबिरने 'बापाच्या घरून पैसे घेऊन ये' असे सांगितले. 'त्यानंतर मला खूप मारहाण केली. जेव्हा माझे वडील उपचार करण्यासाठी मला रुग्णालयात घेऊन निघाले होते, तेव्हा रस्त्यात अडवून साबिरने गोंधळ घातला. रस्त्यावरच त्याने तीन वेळा तलाकचा उच्चार करत घटस्फोट दिला.'
पोलिसांकडून चौकशी सुरू
पीडित विवाहितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीविरोधात प्राथमिक तक्रार दाखल करून घेतली आहे. भाजप सरकार नव्याने निवडून आल्यापासून हा मुद्दा तापला आहे. कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत पुन्हा हा मुद्दा चर्चेसाठी आणला आहे.