कोलकाता- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (गुरुवारी) तिहेरी तलाक विधेयकावर सही करत त्याचे कायद्यात रुपांतर केले. परंतु, बंगालमध्ये आजच पतीने तिहेरी तलाक देताना पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प. बंगाल : तिहेरी तलाक देत पतीने पत्नीची केली हत्या - गौरी ग्रामपंचायत
नूर बानो असे मृत पत्नीचे नाव आहे. या घटनेनंतर पती आणि सासरमंडळी सर्वजण फरार झाले आहेत.
प्रतिकात्मक छायाचित्र
पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूरमधील गौरी ग्रामपंचायतमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. नूर बानो असे मृत पत्नीचे नाव आहे. या घटनेनंतर पती आणि सासरकडची मंडळी सर्वजण फरार झाले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.