महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खजिन्यासाठी पतीने केला पत्नीचा खून, म्हणाला...'मी नाही भूताने तिला मारलं'

कर्नाटकमध्ये एका माणसाने घरासमोर पुरलेला कथित खजिना मिळवण्यासाठी आपल्या पत्नीचा खून केला आहे.

खजिन्यासाठी पतीने केला पत्नीचा खून
खजिन्यासाठी पतीने केला पत्नीचा खून

By

Published : Dec 26, 2019, 6:24 PM IST

बंगळुरू - कर्नाटकमध्ये एका माणसाने घरासमोर पुरलेला कथीत खजिना मिळवण्यासाठी आपल्या पत्नीचा खून केला आहे. ही घटना कर्नाटकमधील नेलामंगला येथे घडली.


आरोपीचे नाव मुन्सिफ उल्ला असून त्यांने पत्नी हिना कौसर हिची हत्या केली आहे. मुन्सिफ याने 13 वर्षांपूर्वी हिनासोबत लग्न केले होते. त्यांना दोन अपत्यदेखील आहेत.

खजिना मिळवण्यासाठी मुन्सिफनेच हिनाची हत्या केली असल्याचा आरोप हिनाच्या आई-वडिलांनी केला. मात्र, मुन्सिफने आरोप फेटाळत हिनाला भूतानेच ठार मारले असल्याचे म्हटले आहे. माझ्या घरासमोर एक खजिना असल्याचे हिना मला नेहमी सांगायची. एका दिवशी तिला भूताने मारहाण केल्याचे देखील तो म्हणाला. हिनाच्या आई-वडिलांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details