नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. पत्नीने घर सोडण्याची धमकी दिल्यानंतर पतीने तीच्या नाकाचा चाव घेत नाक कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार असून पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पतीने कापले पत्नीचे नाक, महिला रुग्णालयात दाखल - लखीमपूर
पत्नीने घर सोडण्याची धमकी दिल्यानंतर पतीने तीच्या नाकाचा चाव घेत नाक कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार असून पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रविवारी निमगाव परिसरातील मुडिया गावात ही घटना घडली. पीडित सरोजिनी देवी (वय 34) यांच्यावर पती मूलचंद यांनी हल्ला केला. घरगूती वादामुळे सरोजिनी गेल्या सहा महिन्यापासून पतीपासून विभक्त राहत होती. गेल्या बुधवारी गाव प्रमुखांच्या सांगण्यावरून घरी परतली होती. रविवारी दोघांध्ये वाद झाल्यावर पत्नीने घर सोडून जाण्याची धमकी दिली. त्यावर रागाच्या भरात पती मूलचंदने तीच्या नाकाचा चावा घेतला. त्यामुळे महिलेचे निम्मे नाक कापल्या गेले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी नीमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर पती फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.