कोलकाता - कोरोना संकटाविरोधात गेल्या दीड महिन्यापासून झुंज देणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आया, सफाई कामगार यांच्या सन्मानार्थ पश्चिम बंगालमधील हावडा पुलावर 'साऊंड अँड लाइट शो' करण्यात आला आहे.
कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ हावडा पुलावर 'साऊंड अँड लाइट शो' - हावडा पुलावर 'साउंड अँड लाइट शो'
कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ पश्चिम बंगालमधील हावडा पुलावर 'साऊंड अँड लाइट शो' करण्यात आला आहे.
यापूर्वी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 159 व्या जयंतीनिमित्त हावडा पुलावर 'साउंड अँड लाइट शो' करण्यात आला होता. साऊंड अँड लाइट शो सिस्टमचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी जानेवारीत कोलकाता दौर्यामध्ये केले होते.
कोरोना वॉरियर्सचा टाळ्या वाजवून, दिवे लावून सन्मान करण्यात आला. तसेच काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव केला होता. तिन्ही सैन्य दलांच्यावतीनं देशभरात विशेष कृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.