नवी दिल्ली - मानवी जीवास घातक निपाह विषाणूमुळे संक्रमित झालेल्या जवळपास ७५ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु परिस्थिती नियंत्रणांत ठेवण्यास आरोग्य विभागाला यश मिळाले. या विषाणूला इंडियन फ्लाईंग फॉक्स असेही म्हटले जाते. या विषाणूचे मानवांमध्ये संक्रमण कसे होते, हे एक रहस्य बनून राहिले आहे.
आता सहा वर्षानंतर मल्टी डिस्पेलनरी अभ्यासानंतर स्पष्ट झाले आहे, की निपाह व्हायरस काय आहे. या विषाणून २०१८ मध्ये केरळमधील १७ लोकांचा जीव घेतला होता. खराब झालेल्या फळांमधून हा विषाणू पसरला होता.
एका संशोधनानुसार निपाह व्हायरस फळांद्वारे पसरतो. जेणे मनुष्यास संक्रमण झाले अशा ठिकाणीच नव्हे तर फळांची वाहतूक होणाऱ्या सर्व ठिकाणांवर या व्हायरसचे संक्रमण होऊ शकते. या विषाणूची लागण रोखण्यासाठी संक्रमित फळांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.