हैदराबाद - कोरोना विषाणुपासून निर्माण झालेल्या महामारीने मानवी जीवनावर परिणाम केला आहे. २४मार्चला या महामारीमुळे देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोसळत गेली आणि शिक्षण जगतावर याचा तीव्र परिणाम झाला आहे. देश आता ऑनलाईन शिक्षणाच्या दिशेने अग्रेसर झाला आहे. तरी सध्याच्या घडीला भारत अशा प्रकारच्या शिक्षणासाठी कितपत तयार आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. येथे हे सांगायला हवे की २४ मार्चपासून शाळा, महाविद्यालयांच्या फाटकांना कुलूप लागले आहे, कारण देश लॉकडाऊनमध्ये आहे.
आपल्या सर्वांना ठाऊकच आहे, कोरोना विषाणु हा एक संसर्गजन्य रोग आहे. यापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्याशिवाय दुसरा कोणताही उपाय भारतासह संपूर्ण जगाकडे नाही. कारण कोरोनावर उपचारासाठी अजून औषधांचा शोध लागलाच नाही. लॉकडाऊनमध्ये कुणीही समूहात राहू शकत नाही. कारण यामुळे कोरोना पसरण्याचा धोका जास्त असतो. सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार लोकांना आपल्या घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या परिस्थितीत शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांचे कार्य सामान्यपणे चालणे अवघड होणार आहे. कारण शाळा, महाविद्यालयांमध्ये मुलांना एका ठिकाणी जमणे आवश्यक असते आणि जे लॉकडाऊनमध्ये शक्य नाही. अशात आता ऑनलाईन शिक्षणाच्या मागणीला जोर चढू लागला आहे.
पण प्रश्न हा आहे की भारत ऑनलाईन शिक्षणाला एक पर्याय म्हणून तर स्विकारू शकतो, परंतु त्या पद्धतीला आपलंसं करण्यास तयार होईल?
आम्ही असे मानतो की लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण सामान्य पद्घतीने दिल्या जाणार्या शिक्षणासाठी उत्कृष्ट पर्याय होऊ शकतो. परंतु येथे अनेक प्रकारच्या अडचणी समोर येऊ शकतात. कारण भारतातील मुलांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अभ्यास करण्याची, एकत्र शिकण्याची सवय आहे. शिक्षकही मुलांच्या समोरासमोर राहूनच शिकवतात. अशात हा सर्वात मोठा प्रश्न आहे की भारत समोरासमोर राहून शिक्षणापासून दूर जाऊन ऑनलाईन शिक्षणासाठी तयार आहे का? या देशात ऑनलाईन वर्गांसारखे मोठे बदल आणले जाऊ शकतात?
मुलांच्या शिक्षणाचे होणारे नुकसान कमीत कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ऑनलाईन योजनेवर काम सुरू केले आहे. ते अधिक चांगले बनवण्यासाठी लोकांकडून सूचनाही मागवल्या आहेत.
एक चांगली गोष्ट हीही आहे किंवा याला आम्ही आशेचा किरणही म्हणू शकतो कारण काही शिक्षक मोठ्या प्रमाणावर खुल्या ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या पोर्टलचा उपयोग करत आहेत. विद्यार्थीही त्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत.
क्यूएसच्या अहवालानुसार कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊननंतर भारताने ऑनलाईन अभ्यासक्रमांचा स्वीकार केला आहे, परंतु तो त्यासाठी संपूर्णपणे तयार नाही. वास्तविकता अशी आहे की काही शिक्षक मोठ्या प्रमाणावर खुल्या ऑनलाईन अभ्यासक्रमांसारख्या पोर्टलचा उपयोग करत आहेत.