महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एखाद्या महामारीवर कशी प्रतिक्रिया द्यायची नाही, हा अभ्यासाचा विषय- राहुल गांधी - Rahul Gandhi opposes central government

राहुल गांधी यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाउंटवर बीबीसीचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत भारताची कोविड महामारीदरम्यानच्या स्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. कोविड काळात परराज्यातील कामगारांना झालेल्या समस्या, कोविडचे वाढते रुग्ण आणि मृत रुग्ण, याबाबत माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओचा आधार घेऊन राहुल गांधी यांनी कोविड दरम्यान केंद्र सरकारच्या कामगिरीवर ताशेरे ओढले आहे. एखाद्या महामारीवर कशी प्रतिक्रिया द्यायची नाही, हा अभ्यासाचा विषय असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी
राहुल गांधी

By

Published : Oct 11, 2020, 8:25 PM IST

नवी दिल्ली-काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोविडवरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. एखाद्या महामारीवर कशी प्रतिक्रिया द्यायची नाही, हा अभ्यासाचा विषय आहे, असे म्हणत राहुल यांनी कोविड परिस्थिती हाताळण्याच्या केंद्र सरकारचा पद्धतीवर टीका केली.

राहुल गांधी यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाउंटवर बीबीसीचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत भारताची कोविड महामारीदरम्यानच्या स्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. कोविड काळात परराज्यातील कामगारांना झालेला त्रास, कोविडचे वाढते रुग्ण आणि मृत रुग्ण याबाबत माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओचा आधार घेऊन राहुल गांधी यांनी कोविड दरम्यान केंद्र सरकारच्या कामगिरीवर ताशेरे ओढले आहे. एखाद्या महामारीवर कशी प्रतिक्रिया द्यायची नाही, हा अभ्यासाचा विषय असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, भारतात कोविड रुग्णांची संख्या ही ७० लाखाच्या पार गेली आहे. ६० लाख नागरिक कोविड आजारातून बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील कोविड रुग्णांचे बरे होण्याच प्रमाण हे ८६.१७ टक्के इतके आहे.

हेही वाचा-बाबरी मशीद निकाल : मुस्लीम कायदा मंडळ उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

ABOUT THE AUTHOR

...view details