नवी दिल्ली - वरिष्ठ काँग्रेसने पी. चिदंबरम सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांनी सोमवारी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविषयी (एनआरसी) प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी सरकारने सोमवारी बांग्लादेशी सरकारला एनआरसीच्या प्रक्रियेचा त्यांच्या देशावर विपरीत परिणाम होण्याची खात्री दिली आहे. अशा स्थितीत नोंदणीकरण प्रक्रियेत समावेश न होणाऱ्या १९ लाख लोकांबाबत सरकार काय निर्णय घेणार आहे, असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे.
माजी अर्थमंत्री चिदंबरम यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या वतीने याविषयी ट्विट केले आहे.