भूवनेश्वर -कोरोना नियमावलीचे पालन करण्यात येत नसल्यामुळे भुवनेश्वर महानगर पालिकेने एका खासगी रुग्णालयाला टाळे ठोकले आहेत. या रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याचेही समोर आले आहे.
ओडिशा: रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 27 जणांना कोरोना, रुग्णालयास टाळे - corona update odisha
राज्यातील सर्व कोरोना बाधित रुग्णांना कोरोना विशेष रुग्णालयात पाठविण्याचे आदेश ओडिशा सरकारने खासगी आणि सरकारी रुग्णालयांना दिले आहेत. असे असूनही काही रुग्णालये या नियमावलीचे उल्लंघन करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका कोरोनाबाधित रुग्णाला कोरोना विशेष रुग्णालयात पाठविण्याऐवजी या खासगी रुग्णालयात भरती करुन घेण्यात आले होते. तेथेच त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. त्यानंतर या रुग्णालयातील 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, तसेच मंचेश्वर भागातील इतर 11 जणांनाही बाधा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रुग्णालयातील सर्व 16 कर्मचारी या कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याचे समोर आले आहे. राज्यातील सर्व कोरोना बाधित रुग्णांना कोरोना विशेष रुग्णालयात पाठविण्याचे आदेश ओडिशा सरकारने खासगी आणि सरकारी रुग्णालयांना दिले आहेत. असे असूनही काही रुग्णालये या नियमावलीचे उल्लंघन करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.