महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उपचाराचे पैसे न दिल्याने ८० वर्षांच्या रुग्णाला बांधले बेडला; मध्यप्रदेशातील धक्कादायक घटना - old man tied to bed in hospital

उपचारानंतर फी भरण्यासाठी पैसे नसल्याने एका ८० वर्षांच्या वृद्धाला बेडला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शाजापूर जिल्ह्यात समोर आला आहे. जवळील सर्व पैसे उपचारासाठी खर्च केले. आता उर्वरित पैसे भरण्याची ऐपत नसल्याने रुग्णालय प्रशास डिस्चार्ज देत नसल्याचा आरोप रुग्णाच्या मुलीने केला आहे. यासाठी वडिलांना दोरीने बांधून ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

elder patient tied in hospital
उपचारानंतर फी भरण्यासाठी पैसे नसल्याने एका ८० वर्षांच्या वृद्धाला बेडला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शाजापूर जिल्ह्यात समोर आला

By

Published : Jun 6, 2020, 11:40 AM IST

Updated : Jun 6, 2020, 12:24 PM IST

शाजापूर (मध्यप्रदेश) - शहरातील एका रुग्णालयात मानवतेला लाजवणारा प्रकार समोर आला आहे. उपचारानंतर फी भरण्यासाठी पैसे नसल्याने एका ८० वर्षांच्या वृद्धाला बेडला बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. जवळील सर्व पैसे उपचारासाठी खर्च केले. आता उर्वरित पैसे भरण्याची ऐपत नसल्याने रुग्णालय प्रशास डिस्चार्ज देत नसल्याचा आरोप रुग्णाच्या मुलीने केला आहे. यासाठी वडिलांना दोरीने बांधून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पाच दिवसांपासून रुग्णांला बांंधून ठेवले असून आमचे ऐकण्यास कोणीही तयार नसल्याचे त्या म्हणाल्या.

उपचारानंतर फी भरण्यासाठी पैसे नसल्याने एका ८० वर्षांच्या वृद्धाला बेडला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शाजापूर जिल्ह्यात समोर आला

संबंधित पीडित रुग्ण राजगढ जिल्ह्यातील आहे. उपचारांसाठी शाजापूर येथील रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी भरती होण्याआधी रुग्णालयात अकरा हजार रुपये जमा केले होते. उपचार घेतल्यानंतर डिस्चार्ज देताना रुग्णालय प्रशासनाने त्यांना आणखी ११ हजार २७० रुपयांची पावती दिली. मात्र रुग्णाजवळ पैसे नसल्याने हॉस्पिटलने त्यांना डिस्चार्ज देण्यास नकार दिला. तसेच रुग्ण कुठेही जाऊ नये यासाठी त्यांना दोरीने बांधून ठेवण्यात आले. पाच दिवसांपासून अन्नपाणी वेळेत न दिल्याचा आरोप त्यांच्या मुलीने केलाय. तसेच जवळील सर्व रक्कम रुग्णालयाला दिल्याने आता पैसे संपल्याचे रुग्णाच्या मुलीने सांगितले.

Last Updated : Jun 6, 2020, 12:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details