महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

थंडीपासून बचाव करण्यासाठी घोड्यांना पाजली जाते दारू - कडाक्याची थंडी बातमी

उत्तर भारतातील राज्यांमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये हिमवर्षाव होत असून नागरिकांनाच नाही तर प्राण्यांनाही थंडीने हुडहुडी भरली आहे.

extreme cold
घोड्यांना पाजली जाते दारू

By

Published : Jan 16, 2020, 2:46 PM IST

डेहरादून - उत्तर भारतातील राज्यामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये हिमवर्षाव होत असून नागरिकांनाच नाही तर प्राण्यांनाही थंडीने हुडहुडी भरली आहे. अशा कडाक्याच्या थंडीपासून घोड्यांचा बचाव करण्यासाठी घोडेमालक अनेक क्लृप्त्या वापरत आहेत.

थंडीपासून बचाव करण्यासाठी घोड्यांना पाजली जाते दारू
उत्तराखंडमधील नैनितालमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी घोड्यांना दारू पाजण्यात येत आहे, तसेच घोड्यांचे मालक त्यांच्या अंगावर चादर टाकत आहेत. घोड्याच्या पायांना गरम कापडी पट्ट्या बांधून डोक्यावर आणि तोंडावरही मफलर बांधत आहेत. कडाक्याची थंडी असल्यामुळे आम्हाला असे करावे लागत असल्याचे एका घोडेमालकाने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details