हैदराबाद - आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात तिहेरी रस्ता अपघात झाला असून यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकने एका दुचाकीला धडक दिली तर कारने ट्रकला मागच्या बाजूने धडकली.
आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात तिहेरी अपघात ; 4 जण ठार - चीत्तूर लेटेस्ट न्यूज
आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात तिहेरी रस्ता अपघात झाला असून यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघात
पलामकुलापल्ले येथील पलामानेरू राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहचली आहे. दुचाकीवरील मृताची ओळख पटली असून व्यकंटेश्वर रेड्डी (29) , रतनाम्मा (49), श्रीनीवासुलु रेड्डी (55) , बाबू (45) , अशी मृताची नावे आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
राजस्थानताली जैसलेमरमध्ये जीप आणि दुचाकीमध्ये टक्कर झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कुंदन सिंग समुंदर सिंग आणि सौभाग्य सिंग अशी मृतांची नावे आहेत.
Last Updated : Aug 30, 2020, 1:59 PM IST