हाँगकाँग- आज हाँगकाँग विधिमंडळाने एक वादग्रस्त विधेयक मंजूर केले आहे. त्यानुसार हाँगकाँगच्या नागरिकांनी चीनच्या राष्ट्रगीताचा अवमान करणे कायदेभंग ठरणार आहे.
हाँगकाँगमध्ये चीनच्या राष्ट्रगीताचा अपमान केल्यास 3 वर्षांचा कारावास - outlaws insulting China's national
राष्ट्रगीताबद्दलचे हे विधेयक चीनच्या तुलनेत अर्धस्वायत्त असलेल्या हाँगकाँगच्या नागरिकांची अभिव्यक्ती व अधिकाराचे उल्लंघन करणारे आहे, अशी लोकशाही समर्थित संभासदांची समजूत आहे.
चीनच्या राष्ट्रगीताविषयी हाँगकाँगच्या नागरिकांमध्ये आदर असावा, या कारणाने हे विधेयक मंजूर करणे आवश्यक होते, असे विधिमंडळातील बीजिंग समर्थक संभासदांचे म्हणणे आहे. नागरिकांनी 'मार्च ऑफ वाॅलेन्टिअर्स' या चीनच्या राष्ट्रगीताचा अपमान केल्यास त्यांना 3 वर्षांचा कारावास आणि 50 हजार हाँगकाँग डॉलर्स एवढा दंड भरावा लागणार आहे.
या विधेयकाचा लोकशाहीसमर्थक सभासदांनी तीव्र विरोध केला आहे. राष्ट्रगीताबद्दलचे हे विधेयक चीनच्या तुलनेत अर्धस्वायत्त असलेल्या हाँगकाँगच्या नागरिकांची अभिव्यक्ती व अधिकराचे उल्लंघन करणारे आहे, अशी संभासदांची समजूत आहे.