नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरसंबंधी आज गृह मंत्रालयाची एक उच्चस्तरीय बैठक होणार आहे. गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून यात भारत सरकारचे सचिव स्तरावरील अधिकारी सहभागी होतील.
जम्मू-काश्मीर मुद्द्यावर आज गृहमंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक
गृह सचिव अजय कुमार भल्ला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. बैठकीत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 कार्यान्वित होण्यावर चर्चा होईल. यामध्ये जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त सचिवही सहभागी होतील.
अमित शाह
गृह सचिव अजय कुमार भल्ला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. बैठकीत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 कार्यान्वित होण्यावर चर्चा होईल. यामध्ये जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त सचिवही सहभागी होतील.
५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 रद्द करण्यात आले. तसेच, जम्मू-काश्मीरची पुनर्रचनेचे विधेयकही मांडण्यात आले. जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा रद्द करून जम्मू-काश्मीर आणि लडाख या नव्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली.