नवी दिल्ली - गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शीघ्र कृती दलाच्या १६ जवानांना वीरमरण आले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची दखल घेतली असून ट्विट करून त्यांनी जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.
नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला अत्यंत भ्याड आणि निराशाजनक - राजनाथ सिंह - naxal attack
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सुरक्षा दले यांच्या आम्ही संपर्कात असून त्यांना अपेक्षीत असलेले सर्व सहकार्य पुरवण्यास आम्ही तत्पर असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे.
नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला अत्यंत भ्याड आणि निराशाजनक - राजनाथ सिंह
गडचिरोलीत पोलिसांवर झालेला हल्ला हे अत्यंत भ्याड आणि निराशाजनक कृत्य असून या हल्ल्यात प्राण गमावलेल्या आमच्या जवानांचा आम्हाला अभिमान आहे. देशासाठी केलेले हे त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. वीरमरण आलेल्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना आहे, असे ट्विटरवरून त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सुरक्षा दले यांच्या आम्ही संपर्कात असून त्यांना अपेक्षीत असलेले सर्व सहकार्य पुरवण्यास आम्ही तत्पर असल्याचे ते म्हणाले.