महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कॅब'वरून ईशान्य भारत पेटलेलाच; अमित शाहांचा पुर्वनियोजित दौरा रद्द

ईशान्य भारतात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शिलाँग दौरा रद्द करण्यात आला आहे. पोलीस गोळीबारात आत्तापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Assam protest
आसाम आंदोलन

By

Published : Dec 13, 2019, 7:47 PM IST

नवी दिल्ली- ईशान्य भारतात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शिलाँग दौरा रद्द करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, जपानचे पंतप्रधान शिंजो अ‌ॅबे यांचा पूर्वनियोजित भारत दौराही पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे. आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमधील आक्रोश कमी होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

हेही वाचा -नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक सर्व राज्यांना लागू करावेच लागणार; 'ही' आहे घटनात्मक तरतूद


अमित शाह दोन दिवस ईशान्य भारत दौऱ्यावर येणार होते. रविवारी ते 'नॉर्थ ईस्ट पोलीस अ‌ॅकॅडमी'ला भेट देणार होते. मात्र, आसामसह इशान्येकडील राज्यांमध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. पोलीस गोळीबारात आत्तापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -राहुल गांधींच्या "त्या" वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

संचारबंदीचा आदेश झुगारून गेल्या दोन दिवसांपासून नागरिक विधेयकाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आसामधील शाळा महाविद्यालये कालपासून तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. आसामधील दहा जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आंदोलनामुळे ढासळली आहे. स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनामुळे ईशान्येकडील राज्यांमधील जनजीवन ठप्प झाले आहे. मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details