नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. स्वत: शाह यांनीच टि्वट करून याबाबत अधिकृत माहिती दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना विलगिकरणाचे आवाहन - अमित शाह बातमी
'कोरोनाची काही सौम्य लक्षणे आढळल्यानंतर मी चाचणी केली. यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. मी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहे. दरम्यान, या काळात माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वत:ला विलगीकरणात ठेवावे', असे आवाहनही शाह यांनी टि्वटद्वारे केले आहे.

गृहमंत्री अमित शाहंना कोरोनाची लागण; टि्वट करून दिली माहिती
'कोरोनाची काही सौम्य लक्षणे आढळल्यानंतर मी चाचणी केली. यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. मी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहे. दरम्यान, या काळात माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वत:ला विलगीकरणात ठेवावे', असे आवाहनही शाह यांनी टि्वटद्वारे केले आहे.
Last Updated : Aug 2, 2020, 5:12 PM IST