नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (गुरुवारी) नवी दिल्ली ते वैष्णवदेवी (कटरा, जम्मू काश्मीर) धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अमित शाह यांच्याबरोबर रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि इतर मंत्री होते. आज उद्घाटन केले असले तरी ५ ऑक्टोबरपासून रेल्वे नियमित धावणार आहे.
दिल्ली ते वैष्णवदेवी धावणार वंदे भारत एक्सप्रेस, अमित शहांनी दाखवला हिरवा झेंडा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (गुरुवारी) नवी दिल्ली ते वैष्णवदेवी (कटरा, जम्मू काश्मीर) धावणाऱ्या 'वंदे भारत एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवला.
वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन ३ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून झाले. सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी अमित शाह यांनी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत एक्सप्रेस अंबाला, लुधियाना, जम्मू तावी मार्गे सायंकाळी ६ च्या दरम्यान कटराला पोहचणार आहे. या एक्सप्रेसला १६ डबे असून १ हजार १०० प्रवासी बसू शकतात.
५ ऑक्टोबरपासून ही एक्सप्रेस दररोज नवी दिल्ली ते कटरा दरम्यान धावणार आहे. या एक्सप्रेससाठी बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. या रेल्वेमुळे दिल्ली ते वैष्षवदेवी मधील अंतर ४ तासांनी कमी होणार आहे.