नवी दिल्ली -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी 'निगेटिव्ह' आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्याने मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. गुडगावमधील मेधांता या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. १२ दिवसानंतर त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी 'निगेटिव्ह'
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी 'निगेटिव्ह' आली आहे. चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती शाह यांनी ट्विटरवरून दिली. तसेच शुभचिंतकांचे आभार मानले आहेत.
कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती शाह यांनी ट्विटरवरून दिली. "आज माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी देवाचे आभार मानतो. या काळात ज्यांनी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, माझ्या कुटुंबियांचे धाडस वाढविले. त्या सर्वांचे मी आभार मानतो" असे ट्विट शाह यांनी केले आहे.
२ ऑगस्टला शाह यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहीतीही त्यांनी ट्विटवरून दिली होती. 'कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर मी चाचणी केली. यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. मी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहे. दरम्यान, या काळात माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वत:ला विलगीकरणात ठेवावे', असे आवाहनही शाह यांनी टि्वटद्वारे केले होते. मात्र, आता शाह कोरोनामुक्त झाले आहेत.