अहमदाबाद - गृहमंत्री अमित शाह यांना अहमदाबादमधील के. डी. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
गृहमंत्री अमित शाहांवर अहमदाबादमधील रुग्णालयात शस्त्रक्रिया - amit shah in ahmedabad
अमित शाह सामान्य रुग्णाप्रमाणे कोणतीही मोठी सुरक्षा न घेता रुग्णालयात दाखल झाले. यापूर्वीही त्यांचे येथे रुटीन चेकअप करण्यात आले होते.
अमित शाह
शाह काल कौटुंबिक कार्यक्रमासाठी अहमदाबादला गेले होते. त्यांना त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी के. डी. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ५ वाजेपर्यंत रुग्णालयात ठेवले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रिया संपताच त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
अमित शाह सामान्य रुग्णाप्रमाणे कोणतीही मोठी सुरक्षा न घेता रुग्णालयात दाखल झाले. यापूर्वीही त्यांचे येथे रुटीन चेकअप करण्यात आले होते.
Last Updated : Sep 4, 2019, 1:34 PM IST