महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 26, 2020, 11:56 AM IST

ETV Bharat / bharat

२६ फेब्रुवारी : याच दिवशी पडली होती इंग्रजाविरुद्धच्या लढ्याची पहिली ठिणगी

देशासह जगाच्या दृष्टीने २६ फेब्रुवारीला विशेष महत्व आहे. कारण या दिवशी अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत. इंग्रजांविरुद्धच्या लढ्याला खऱ्या अर्थाने २६ फेब्रुवारी १८५७ ला सुरुवात झाली. बेहरामपूरच्या छावणीत २६ फेब्रुवारी १८५७ ला शिपायांनी प्रथम इंग्रजांविरुद्ध लढा दिला.

History of 26 february
२६ फेब्रुवारीला घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

नवी दिल्ली - व्यापाराच्या हेतून भारतात आलेल्या इंग्रजांनी भारतावर १५० वर्ष राज्य केले. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजांनी हळूहळू भारतात पाय पसरायला सुरुवात केली होती. इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणाविरुद्ध अनेकांनी लढा दिला. मात्र, इंग्रजांविरुद्धच्या लढ्याची पहिली ठिणगी २६ फेब्रुवारी १८५७ ला पडली.

बेहरामपूरच्या छावणीत २६ फेब्रुवारी १८५७ ला शिपायांनी प्रथम इंग्रजांविरुद्ध लढा दिला. इंग्रजांनी नवी काडतुसे आणली होती. या काडतुसांमध्ये गाय आणि डुक्कर यांची चरबी असल्याची माहिती सैनिकांनी मिळाली होती. त्याविरोधी सैनिकांनी इंग्रजांच्या विरोधी भूमिका घेतली. हीच इंग्रजांविरोधी आंदोलनाची पहिली ठिणगी होती. काडतुसांच्या वापरासाठी ती प्रथम तोंडाने तोडावी लागत असे. साहजिकच त्यावरील चरबी शिपायांच्या तोंडात जात असे. गाईला हिंदू पवित्र मानतात. तर डुकराला मुसलमान अपवित्र मानतात. त्यामुळे हिंदू व मुसलमान शिपाई संतप्त झाले. अशाप्रकारे शिपायांचा क्रोध वाढत गेला. या असंतोषाचा पहिला उद्रेक आजच्या दिवशीच झाला होता.

देशासह जगात २६ फेब्रुवारीला घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • ३२०: चंद्रगुप्त प्रथम पाटलीपुत्रांचा शासक बनला.
  • १८५७: पश्चिम बंगालमधील बहरामपूरमधील स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांविरूद्ध पहिले लष्करी बंड सुरू केले.
  • १९०४: बंगाली लेखक लीला मजुमदार यांचा जन्म.
  • १९३७: प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म.
  • १९५८: पियाली बरुआ आणि दिवाण मणिराम दत्ता यांनी आसाममधील शाही घराण्यांना पुन्हा गादीवर बसवण्याचा प्रय्तन केल्यामुळे त्यांना फाशी देण्यात आली.
  • १९६६: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे निधन.
  • १९७५: देशातील पहिले पतंग संग्रहालय 'शंकर केंद्र' गुजरातमध्ये स्थापन करण्यात आले.
  • १९६७: सोव्हिएत युनियनने पूर्व कझाकिस्तानमध्ये भूमिगत अणुचाचणी घेतली.
  • १९७६: अमेरिकेने नेवाडा चाचणी साइटवर अणुचाचणी घेतली.
  • १९९३: न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 6 लोक ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले.
  • २००४: महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निधन.
  • २०११: अल्जेरियाच्या अध्यक्षांनी अरब देशांच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे 19 वर्षांपूर्वी लादलेली आणीबाणी अधिकृतपणे संपुष्टात आणली.

ABOUT THE AUTHOR

...view details