महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जैसलमेरचा ऐतिहासिक 'जसेरी तलाव', ४०० वर्षांपासून स्थानिकांसाठी ठरतोय वरदान! - historical lake in desert jaisalmer news

जैसलमरेच्या जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या कुलधारा खाभा रोडवरील डेढा या गावात एक ऐतिहासिक जसेरी तलाव आहे. हा तलाव पालीवाल संस्कृतीचे प्रतिक असून आसपासच्या शेकडो गावातील लोकांसाठी मोठा आधार आहे. इतिहासकारांच्या माहितीनुसार जवळपास ४०० वर्षांपूर्वी एका दिराने त्याच्या वहिनीला पाण्यावरून टोमणा मारला आणि म्हणून तिच्या वडिलांनी हा तलाव बांधला. त्यामुळे याचे नाव जसबाईच्या नावावरून जसेरी तलाव असे पडले.

जैसलमेरचा ऐतिहासिक 'जसेरी तलाव
जैसलमेरचा ऐतिहासिक 'जसेरी तलाव

By

Published : Sep 8, 2020, 6:13 AM IST

जैसलमेर (राजस्थान) : सुमारे चारशे वर्षांपूर्वी जैसलमेर जिल्ह्यातील डेढा या गावात एक असा चमत्कारिक तलाव खोदण्यात आला. हा तलाव बांधला गेला तेव्हापासून आजपर्यंत जवळपासच्या अनेक गावांची तहान भागवत आहे. येथील नागरिकांसाठी हा तलाव एकप्रकारे वरदान ठरला आहे.

जैसलमेरचा ऐतिहासिक 'जसेरी तलाव'

जैसलमेरपासून 50 किमी अंतरावर असलेल्या कुलधरा खाभा रोडवरील डेढा या गावात असलेला हा ऐतिहासिक तलाव पालीवाल संस्कृतीचे प्रतिक आहे. अनेक शतके उलटल्यानंतरही या प्राचीन तलावाच्या पाण्याने आजपर्यंत कधीही पातळी गाठली नाही. या भागात ३ ते ४ वर्षे पाऊस पडला नसला तरीही हा तलाव नेहमी भरून असतो. तो आजपर्यंक कधीही कोरडा पडलेला नाही. आजही दररोज सुमारे डझनभर गावांमधील 50 हून अधिक टँकर या तलावातून पाणी घेतात. या ऐतिहासिक तलावाचे चित्र राजस्थानमधील पारंपरिक पेयजल स्त्रोतांच्या आणि समृद्ध संस्कृतीच्या वारश्याच्या रुपात, दिल्लीच्या विज्ञान भवनात लावण्यात आले आहे. याशिवाय हा तलाव अनेक पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रही राहिला आहे.

तलावाचा इतिहास -

या तलावाची माहिती देताना येथील ग्रामसथांनी एक दंतकथा सांगितली. त्यांच्यानुसार चारशे वर्षांपूर्वी हे गाव पालीवाल संस्कृतीचा भाग होते. तेव्हा जवळच असलेल्या गाझिया येथील पालीवाल जातीच्या एका श्रीमंत सेठची मुलगी जसबाईचे लग्न या गावात झाले. तेव्हा पिण्याचे पाणी आणण्याकरता दूर जावे लागत होते. एकेदिवशी जसबाई पाणी आणण्याकरता गावातील विहीरीजवळ गेली. तेव्हा एका माणूस आपल्या गुरांना पाणी पाजत होता. तेव्हा जसबाईने त्या गुराख्याला पाणी भरू देण्याची विनंती केली. मात्र, गुराख्याने तिची विनंती फेटाळून लावली. यामुळे जसबाईला तेथे तात्कळत राहावे लागले आणि पाणी भरायला उशीर झाला.

यानंतर, जसबाई घराकडे निघाली असता वाटेत तिचा दीर तिला भेटला. जसबाईने घटलेली घटना दीराला सांगितली. मात्र, यावेळी त्याने जसबाईलाच सुनावले. तुला लवकर पाणी भरायचे असेल तर तुझ्या वडिलाला गावात तळे खोदायला सांग असा टोमणा त्याने जसबाईला मारला. ही बाब जसबाईने तिच्या वडिलांपर्यंत पोहोचवली. मुलीचा संदेश मिळताच जसबाईचे वडील काही कामगारांसह गावात आले आणि त्यांनी तिथे तळे खोदून दिले. या तळ्याला जसबाईच्या नावावरुन 'जसेरी तलाव' असे नाव देण्यात आले.

तलावाच्या तळाला पितळेचा थर -

या तलावाचे बांधकाम करताना त्याच्या तळाला पीतळाचा थर लावण्यात आल्याचेही म्हणतात. ज्या दिवशी या तलावाचे बांधकाम पूर्ण झाले त्या रात्री येथे चांगला पाऊस झाला ज्यामुळे तलाव पाण्याने पूर्ण भरला. दुसऱ्या दिवशी जसबाई तलावावर आली. तिने पाण्याची कळशी भरून घेतली आणि दीराकडे जाऊन माझ्या वडिलांनी खोदलेल्या तलावातून पाणी आणल्याचे सांगितले. त्यानंतर आजपर्यंत कधीच या तलावाचे पाणी आटले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. या तलावात आजही मुबलक पाणी असून ग्रामस्थ दररोज येथील पाणी घेऊन जात असतात. हा तलाव चमत्कारिक असल्याचे येथील लोक मानतात. तर, इतके वर्षे हा तलाव पाण्याने भरला असल्याने तो, शास्त्रज्ञांच्याही संशोधनाचा विषय ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details