महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मूमधील सिटी चौकाचे नाव बदलून ठेवले 'भारत माता चौक' - भारत माता चौक

सीटी चौकाच्या नाव बदलाच्या निर्णयाचे स्थानिकांनी स्वागत केले आहे. तसेच चौकाचे नाव बदल्यानंतर महानगरपालिकेचा विकास आणि स्वच्छतेवरही लक्ष देण्यात यावे, असे स्थानिकांनी म्हटले आहे.

Historic City Chowk in Jammu renamed as 'Bharat Mata Chowk'
Historic City Chowk in Jammu renamed as 'Bharat Mata Chowk'

By

Published : Mar 2, 2020, 9:17 AM IST

श्रीनगर -जम्मूमधील सीटी चौकाचे नाव बदलून आता भारत माता चौक असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. भाजपचे नेतृत्व असलेल्या जम्मू महानगरपालिकामध्ये संबधित प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

सीटी चौकाच्या नाव बदलाच्या निर्णयाचे स्थानिकांनी स्वागत केले आहे. तसेच चौकाचे नाव बदल्यानंतर महानगरपालिकेचा विकास आणि स्वच्छतेवरही लक्ष देण्यात यावे, असे स्थानिकांनी म्हटले आहे.

4 महिन्यांपूर्वी सिटी चौकाचे नाव बदलून भारत माता चौक करण्याचा प्रस्ताव मी सभेत ठेवला होता. तो मंजूर करण्यात आला असून आता चौकाचे नाव बदलण्यात आले आहे, असे जम्मू महानगरपालिकेच्या उप महापौर आणि भाजप नेत्या पोर्णिमा शर्मा यांनी सांगितले.

केंद्र सरकाराने गेल्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात संचारबंधी लागू करून जम्मू-काश्मीरची पुनर्रचना केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details