नवी दिल्ली- दिल्लीमधील मंडी हाऊस येथील बाबर रस्त्याच्या फलकाला हिंदू सेनेने काळे फासले आहे. बाबर रस्त्याला एखाद्या भारतीय महान व्यक्तीचे नाव देण्यात यावे, अशी संघटनेची मागणी आहे. आज (शुक्रवारी) सकाळी लोकांनी जेव्हा दुकाने उघडली तेव्हा ही घटना उघडकीस आली.
भारतावर आक्रमण करणाऱ्या बाबरचे नाव या रस्त्याला देण्यात आले आहे. ते बदलून भारतीय महान व्यक्तीचे नाव देण्यात यावे असे, संघटनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - जस्ट चिल यार! गुजरातच्या रस्त्यांवरून मनसोक्त फिरणाऱ्या सिंहांचा व्हिडिओ व्हायरल