नवी दिल्ली - लोकसभेनंतर बुधवारी राज्यसभेमध्येदेखील नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) पारित झाले. त्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू आणि शीख निर्वासितांनी उत्सव साजरा केला आहे. पाकिस्तानातून आलेल्या हिंदू शरणार्थी महिलेने आपल्या 2 दिवसीय मुलीचे नाव 'नागरिकता' ठेवले आहे. नागरिकताचा जन्म सोमवारी झाला होता.
नागरिकत्व सुधारणा विधेयक : हिंदू शरणार्थी महिलेने मुलीचे नाव ठेवले 'नागरिकता'
नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) पारित झाल्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू आणि शीख निर्वासितांनी उत्सव साजरा केला आहे.
आम्ही एक सुरक्षित आश्रयाच्या शोधात 8 वर्षांपूर्वी भारतात आलो होतो. हे आमचे एकमेव घर आहे. परंतु नागरिकत्व न मिळाल्यामुळे आम्ही दु: खी होतो. मात्र, आता अभिमानाने सांगू शकतो की आम्ही भारतीय आहोत, अशा भावना नागरिकताच्या आजी मीरा दास यांनी व्यक्त केल्या.
नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यामुळे ईशान्य भारतामध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलले निर्वासीत उत्सव साजरा करत आहे. विधेयक पारीत झाल्यामुळे या निर्वासीतांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.