नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काल झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी 'हिंदू रक्षा दल' या हिंदूत्ववादी संघटनेने स्वीकारली आहे. दलाचा अध्यक्ष भूपेंद्र उर्फ पिंकी चौधरी याने मुलांना मारहाण करणारे त्याचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले आहे. देशाचे खाऊन परक्यांचे गीत गाणाऱ्या विद्यार्थ्यांवर असे हल्ले करत राहू, अशी धमकीही त्याने दिली आहे.
जेएनयूमध्ये मारहाण आणि संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. तोंड झाकलेल्या सर्व हल्लेखोरांच्या फोटोंवरून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यानच, हिंदू रक्षा दलाने या घटनेची जबाबदारी घेतली आहे.