महाराष्ट्र

maharashtra

गोडसे, सावरकर समलैंगिकतेचा वाद पेटला; राहुल गांधींना समलैंगिक म्हणत हिंदू महासभेचा पलटवार

By

Published : Jan 3, 2020, 2:08 PM IST

Updated : Jan 3, 2020, 3:26 PM IST

काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात काल (शुक्रवारी) वाटण्यात आलेल्या पुस्तिकेवरून वाद पेटला आहे. सावरकर आणि गोडसे यांच्याबद्दल सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात वादग्रस्त साहित्य वाटण्यात आले. त्यावरून हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी राहुल गांधीवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी, स्वामी चक्रपाणी
राहुल गांधी, स्वामी चक्रपाणी

नवी दिल्ली - काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात काल (शुक्रवारी) वाटण्यात आलेल्या पुस्तिकेवरून वाद पेटला आहे. सावरकर आणि गोडसे यांच्याबद्दल सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात वादग्रस्त साहित्य वाटण्यात आले. यावरून भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. आज हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी राहुल गांधीवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधीही समलिंगी असल्याचे आम्ही ऐकलं असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी

मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये काँग्रेस सेवा दलाचे प्रशिक्षण शिबीर पार पडले. त्यामध्ये एक पुस्तिका वाटण्यात आली होती. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे शारिरीक संबंध असल्याचा उल्लेख केला आहे. या वक्तव्याचा भाजप नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला होता. त्यावरून स्वामी चक्रपाणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

काय आहे प्रकरण?

वीर सावरकर किती वीर होते? अशी पुस्तिका मध्यप्रदेश काँग्रेस सेवा दलाने प्रशिक्षण कार्यक्रमात वाटली. यामध्ये सावरकरांनी १२ वर्षांचे असताना मशिदीवर दगडफेक करून फरशी तोडल्याचे म्हटले आहे. सावरकर अल्पसंख्याक महिलांवर बलात्कार करण्यासाठी लोकांना चिथावणी देत होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सावरकरांनी इंग्रजांकडे लिखित माफी मागितली होती. पुन्हा कोणत्याही राजकीय कामात सहभागी होणार नाही, असे आश्वासन त्यांनी इंग्रजांना दिल्याचे पुस्तिकेत म्हटले आहे.

Last Updated : Jan 3, 2020, 3:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details