नवी दिल्ली - जगभरामध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचे ८० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. दरम्यान, कोरोनाशी लढा देण्यासाठी हिंदू महासभेने शनिवारी चक्क गोमूत्र पार्टी आयोजित केली होती. ही पार्टी राजधानी दिल्लीमध्ये रंगली होती. पार्टीमधील सर्वांनी प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून गोमूत्र प्यायले.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र प्या -
सभेचे आयोजनकर्ते आणी हिंदू महासभेचे अध्यक्ष चक्रपाणी यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले की, या विषाणूने जगभरात अनेकांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे ही पार्टी कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
हिंदू महासभेनं आयोजित केली गौमूत्र पार्टी सर्वांनी गोमूत्र प्यावे आणि देवाची प्रार्थना करावी. गाईच्या लहान वासराचे गोमूत्र कोरोनासाठी सर्वात उत्तम आहे. त्यामुळे प्रतिकार शक्तीत वाढ होते. प्रत्येकाने गोमूत्र प्यावे, असे आवाहन चक्रपाणी महाराजांनी सर्वांना केले.
अनेक मंत्री गोमूत्र पीत असून लवकरच ते संपूर्ण देशात गोमूत्र पार्टी आयोजित करणार आहेत, असा दावा चक्रपाणी महाराजांनी केला.