महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानात हिंदू मुलीची हत्या, धर्मांतरण करण्यास राजी न झाल्याने कृत्य? - forceful conversion in pakistan

पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख, ख्रिश्चन अल्पसंख्याकांच्या जिवाला धोका असल्याचे वारंवार समोर आले आहे. या समाजातील मुलींचे बळजबरीने धर्मपरिवर्तन करून त्यांचे मुस्लीम पुरुषांसह विवाह करण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी सिंध प्रांतातील घोटकी येथे एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला होता. यावरून येथील स्थिती भयानक असल्याचे स्पष्ट होत आहे.

धर्मांतरण

By

Published : Sep 17, 2019, 9:37 PM IST

Updated : Sep 17, 2019, 9:53 PM IST

नवी दिल्ली -पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. सिंध प्रांतातील लरकाना येथील चंदका वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारी एक हिंदू मुलगी मृतावस्थेत सापडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या मुलीचे नाव नम्रता चांदनी असून ती बीडीएसची विद्यार्थिनी होती. तिच्यावर कथितरीत्या धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणला जात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. मात्र, तिची हत्या झाल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांनी या प्रकरणी कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना, दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रमुख मनजिंदर सिंह सिरसा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. पाक पंतप्रधानांनी अल्पसंख्याकांचे बळजबरीने धर्मांतरण केले जाऊ नये, यासाठी असे करणाऱ्या लोकांविरोधात कडक पावले उचलावीत, असे म्हटले आहे. येथे मानवाधिकारांचे हनन होत असताना इम्रानसाहेब आपण गप्प का, असा सवाल सिरसा यांनी ट्विटमधून केला आहे. नोबेल पारितोषिक विजेती पाकिस्तानी मुलगी मलाला आणि संयुक्त राष्ट्रांनाही त्यांनी हे ट्विट केले आहे.

सिरसा यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडियो शेअर केला होता. यामध्ये सुटका झालेल्या एका हिंदू मुलीने स्वतःला बळजबरीने इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि मुस्लीम पुरुषाशी विवाह करण्यासाठी छळ करण्यात आल्याचे सांगितले होते.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान एका बाजूला भारतातील मुस्लिमांविषयी आणि काश्मीरविषयी बोलतात. काश्मीरमधील मुस्लिमांवर भारतात अन्याय होत असल्याचे सांगत हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करतात, त्याच वेळी, पाकिस्तानात हिंदू मुलींच्या अपहरणाचे प्रकार घडत आहेत. त्यांना बळजबरीने मुस्लीम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले आहे, ही या सर्वामध्ये विचित्र बाब असल्याचे सिरसा यांनी म्हटले आहे.

याआधीही पाकिस्तानात शीख आणि हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. याआधीही जगजीत कौर नावाच्या एका मुलीचे जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यात आले होते. ही मुलगी अद्याप तिच्या घरी पोहोचलेली नाही, ही बाबही महत्त्वाची असून लक्ष वेधून घेणारी आहे.

पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख, ख्रिश्चन अल्पसंख्याकांच्या जिवाला धोका असल्याचे वारंवार समोर आले आहे. या समाजातील मुलींचे बळजबरीने धर्मपरिवर्तन करून त्यांचे मुस्लीम पुरुषांसह विवाह करण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी सिंध प्रांतातील घोटकी येथे एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला होता. यावरून येथील स्थिती भयानक असल्याचे स्पष्ट होत आहे. सिरसा यांनी आतापर्यंत बेपत्ता असलेल्या हिंदू मुलींची यादीही ट्विट केली आहे.

Last Updated : Sep 17, 2019, 9:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details