सोलन - हिमाचल प्रदेशातील सोलन येथील नाहन कुमारहट्टी रोडवरील एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत १४ जण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत ४२ लोक सापडले होते. यात ३० जवान आणि १२ नागरिकांचा समावेश होता. २८ जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. जखमींना धर्मपूर रुग्णालयात दाखल केले आहे. जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफचे पथकाने शर्थीने बचावकार्य राबवले.
हिमाचल प्रदेश दुर्घटना : इमारत कोसळून १४ ठार; १३ जवानांसह एका नागरिकाचा समावेश
मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. ते आज घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. ते आज घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आले होते. मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या कारणांची चौकशी करण्याचे तसेच, जखमींना चांगले उपचार देण्याचेही आदेश दिले आहेत. दरम्यान, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. मृतांची संख्या आणखी वाढू नये, यासाठी प्रार्थना केली जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार पावसामुळे इमारतीचा पाया खचल्याने इमारत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीत एकूण कितीजण होते याची माहिती अद्याप मिळाली नाही. इमारतीचा वापर हॉटेलसाठी करण्यात येत होता. या इमारतीत भारतीय सेनेचे ३० जवान आणि १२ स्थानिक लोक होते. पोलीस आयुक्त शिवकुमार शर्मा यांनी बचाव कार्याची माहिती दिली.