चंडीगड -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. मात्र, त्या अगोदर लॉकडाऊनमुळे दुसऱ्या राज्यात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यास सशर्त परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश सरकारने पंजाबच्या चंडीगड येथे अडकलेल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांना परत आणण्याची व्यवस्था केली आहे.
हिमाचल भवन प्रशासनाच्यावतीने ३ मे ला चार जिल्ह्यांतील नागरिकांसाठी बसची व्यवस्था करण्यात आल्याची सूचना अगोदरच अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहचवण्यात आल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात चार जिल्ह्यांतील नागरिकांना हिमाचल प्रदेशमध्ये परत नेण्यात आले.