महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 12, 2020, 5:00 PM IST

ETV Bharat / bharat

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना कोरोनाची लागण

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ते एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. यासंदर्भात त्यांनी टि्वट करून माहिती दिली आहे.

जयराम ठाकूर
जयराम ठाकूर

शिमला -हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: ट्विट करुन तसंच सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे. तथापि, यापूर्वी अमित शाह, नितिन गडकरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सध्या ते होमआयसोलेशनमध्ये आहेत.

'काही दिवसांपूर्वी एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने मला क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यानंतर सौम्य लक्षणं आढळल्याने कोरोना चाचणी केली. तेव्हा अहवाल पॉझिटिव्ह आला. मी सध्या आयसोलेशनमध्ये आहे' अशी माहिती त्यांनी टि्वट करून दिली आहे. दरम्यान, जुलैमध्ये जयराम ठाकूर यांनी कोरोना चाचणी केली होती. मात्र, त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती.

तथापि, हिमाचलमध्ये सध्या 2 हजार 687 जणांवर उपचार सुरू आहे. तर 250 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये देशात 66 हजार 732 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 71 लाखांवर गेली आहे. तर काल दिवसभरात 9 लाख 94 हजार 851 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 8 कोटी, 78 लाख, 72 हजार 93 एवढी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details