शिमला :हिमाचल प्रदेशच्या भाजप आयटी सेलने शिवसेना नेते संजय राऊतांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी कंगना रणौत विरोधात अपशब्दांचा वापर केला होता. हे निंदनीय आहे म्हणत, आयटी सेलने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी आयटी सेलने शिमलाच्या पोलीस अधीक्षकांकडे पत्र देत, राऊतांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. आयटी सेलचे संयोजक चेतन बरागटा यांनी याबाबत माहिती दिली. हिमाचलची कन्या कंगना रणौत हिच्याविरोधात केलेली टीका आपण सहन करणार नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.