नवी दिल्ली- कोरोना महामारीचा विळखा दिवसेंदिवस अधिक वाढताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासात देशभरात एकूण तब्बल १७ हजार २९६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच २४ तासामध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला आहे. गेल्या २४ तासात तब्बल ४०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली या राज्यात मोठ्या प्रमाणात या विषाणूचा फैलाव झाला आहे. गेल्या २४ तासातील आकडेवारीनंतर देशभरात आतापर्यंत तब्बल ४ लाख ९० हजार ४०१ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी २ लाख ८५ हजार ६३७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर अद्याप १ लाख ८९ हजार ४६३ अॅक्टिव्ह केसेस उपचार घेत आहेत. या महामारीमुळे देशात आतापर्यंत तब्बल १५ हजार ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे.