नवी दिल्ली - देशात काल दिवसभरात ९८८७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचसोबत २९४ जणांचा मृत्यू झाला असून आजवर देशात सहा हजार ६४२ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत अधिक माहिती दिली आहे.
चोवीस तासात देशात सर्वाधिक कोरोनाबाधित...भारत 'कम्युनिटी स्प्रेड'च्या वाटेवर? - india corona updates
मागील चोवीस तासात देशात सर्वाधिक कोरोनाबाधित सापडले असून आता कम्युनिटी स्प्रेडची भीती वर्तवण्यात येत आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातच मागील चोवीस तासात आजवर सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.
चोवीस तासात देशात सर्वाधिक कोरोनाबाधित...
देशभरात एकूण २ लाख ३६ हजार ६५७ रुग्ण असून त्यामध्ये एक लाख ५९ हजार ४२ सध्या अॅक्टिव्ह आहेत. आजवर एक लाख चार हजार ७३ कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)