नवी दिल्ली - सध्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांनी 1 लाखाचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासामध्ये देशात नव्या 5 हजार 611 रुग्णांची नोंद करण्यात आली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 6 हजार 750 झाला आहे. यात 61 हजार 149 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 42 हजार 297 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 3 हजार 303 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये 37 हजार 136 कोरोनाबाधित असून 1 हजार 325 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 12 हजार 140 कोरोनाबाधित असून 719 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीमध्ये 10 हजार 554 कोरोनाबाधित तर 168 जणांचा मृत्यू झाला आहे. या पाठोपाठ तामिळनाडूमध्ये 12 हजार 224 कोरोनाबाधित तर 84 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांचा दरही वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 38.73 टक्के झाल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. सध्या अॅक्टिव्ह केसेसमधील 2.9 टक्केच लोकांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. देशभरामध्ये आतापर्यंत 24 लाख 25 हजार 742 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारत इतर देशांपेक्षा चांगल्या स्थितीत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.