नवी दिल्ली- जम्मू काश्मीर राज्यामध्ये तणावाची परिस्थीती निर्माण झाली असतानाच संसदेमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, केंद्रीय गृहसचिव राजीव गऊबा आणि गृहमंत्री अमित शाह यांची संसदेमध्ये महत्त्वाच्या मुद्दयांवर बैठक सुरू झाली आहे.
संसदेत गृहमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची उच्चस्तरीय बैठक सुरू - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, केंद्रीय गृहसचिव राजीव गऊबा आणि गृहमंत्री अमित शाह यांची संसदेमध्ये महत्त्वाच्या मुद्दयांवर बैठक सुरू झाली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
जम्मू काश्मीरमध्ये लष्कराने २८ हजार अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. राज्यामध्ये दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. त्यानुसार जम्मू काश्मीर राज्यामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सरकार जम्मू काश्मीरच्या संविधानीक तरतूदींमध्ये बदल करणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण पसरले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक संसदेमध्ये सुरू आहे.