नवी दिल्ली - शेजारील चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे १ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पंतप्रधानांच्या निर्देशानुसार मंत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी काय तयारी करायला हवी, कोणते उपाय योजायला हवे, यावर मंत्रीगट लक्ष ठेवणार आहे.
COVID-१९: अडीच लाख प्रवाशांची घेतली चाचणी, त्यामधील तिघे कोरोनाने बाधीत - travel ban from china
देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १५ हजार ९९१ नागरिक निगराणीखाली ठेवण्यात आले आहेत. यांच्यापैकी १ हजार ६७१ नागरिकांचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते.
देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १५ हजार ९९१ नागरिक निगराणीखाली ठेवण्यात आले आहेत. यांच्यापैकी १ हजार ६७१ नागरिकांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणासाठी पाठवण्यात आले होते. त्यातील फक्त ३ नमुने सकारात्मक आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
विदेशातून येणाऱ्या २ हजार ३१५ फ्लाईटमधील प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. ही संख्या तब्बल २ लाख ४९ हजार ४४७ आहे. देशभरातील २१ विमानतळावर प्रवाशांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. विमानतळाबरोबरच मोठी बंदरे आणि आंतरराष्ट्रीय सीमांवर देखील तपासणी सुरू आहे. प्रामुख्याने नेपाळ सीमेवर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.