महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कोरोना रुग्णाच्या उच्च मृत्यूदराने गुजरातचे मॉडेल पडले उघडे' - corona positive cases in Gujrat

कोविड – 19 मृत्यूदर : गुजरात 6.2 टक्के, महाराष्ट्र : 3.7 टक्के, राजस्थान : 2.32 टक्के, पंजाब : 2.17 टक्क, पदुच्चेरी : 1.98 टक्के, झारखंड : 0.5 टक्के, छत्तीसगड : 0.35 टक्के. गुजरातचे मॉडेल उघडे पडल्याचे काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले.

Rahul Gandhi
राहुल गांधी

By

Published : Jun 16, 2020, 1:17 PM IST

नवी दिल्ली – गुजरातमधील कोरोना रुग्णाच्या वाढत्या मृत्यूदरावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण उच्च असल्याने गुजरातचे कोरोना नियंत्रणाचे मॉडेल उघडकीस आल्याचा टोला राहुल गांधींनी गुजरातच्या भाजपा सरकावरला लगावलाआहे.

कोविड – 19 मृत्यूदर : गुजरात 6.2 टक्के, महाराष्ट्र : 3.7 टक्के, राजस्थान : 2.32 टक्के, पंजाब : 2.17 टक्क, पदुच्चेरी : 1.98 टक्के, झारखंड : 0.5 टक्के, छत्तीसगड: 0.35 टक्के. गुजरातचे मॉडेल उघडे पडल्याचे काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले.

गुजरात हे भारतामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत चौथ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये मंगळवारपर्यंत कोरोनामुळे 1,505 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 24,055 आहे. गुजरातमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तर राज्याची राजधानी अहमदाबादमधील रुग्णांच्या संख्या कमी होत आहे. तरीही राज्यात रोज नव्याने 488 कोरोनाबाधित आढळत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या देशात सर्वाधिक आहे. तरीही महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर हा गुजरातपेक्षा निम्मा आहे. काँग्रेस ही महाराष्ट्रात महाविकासआघाडीत सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे कोरोनाचा मृत्यूदर आणि संसर्गाचे वाढते प्रमाण या कारणांनी भाजप व काँग्रेस एकमेकांवर टीका करताना यापूर्वी दिसून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details