ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ब्रिटीश युवती स्कार्लेट किलींग हत्येप्रकरणी आज दुपारी निकाल - minor murder goa

फेब्रुवारी २००८ मध्ये ब्रिटिश युवती स्कार्लेट कीलिंग (१५) हीचा उत्तर गोव्यातील अंजुणा समुद्र किनारी मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर चौकशी अंती पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते.

आज दुपारी निकाल
author img

By

Published : Jul 19, 2019, 3:09 PM IST

पणजी- ब्रिटीश युवती स्कार्लेट किलिंग या तरुणीच्या हत्येप्रकरणी गोवा खंठपीठ आज (दुपारी) आरोपी सँमसन डिसोझा याला शिक्षा सुनावणार आहे. त्यापूर्वी न्यायालयाने आरोपीचे म्हणणे ऐकून घेतले आहे.

स्कार्लेट किलींग हत्येप्रकरणी आज दुपारी निकाल

फेब्रुवारी २००८ मध्ये ब्रिटिश युवती स्कार्लेट कीलिंग (१५) हीचा उत्तर गोव्यातील अंजुणा समुद्र किनारी मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर चौकशी अंती पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. बालन्यायालयाने दोघांनाही निर्दोष मुक्त केले होते. मात्र या निकालाला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर बुधवारी १७ तारखेला न्यायालयाने निर्णय देत एकाची निर्दोष मुक्तता केली. तर सँमसन डिसोझा या आरोपीला दोषी ठरवले.

यावर आज गोवा खंडपीठाने शिक्षेपूर्वी सुनावणी घेत दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून घेतले. तेव्हा आरोपीच्यावतीने म्हणणे मांडताना त्याच्या वकिलांनी शिक्षा कमी करण्याची मागणी केली होती. तर तक्रारदाराच्यावतीने अँड. विक्रम वर्मा यांनी गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेत जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने दुपारी ३ वाजता शिक्षा सुनावण्याचे घोषीत केले आहे.

याविषयी बोलताना अँड. वर्मा यांनी सांगितले की, गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेत शिक्षा करावी. कारण नैसर्गिक नियमाने मोठ्यांनी छोट्यांचे रक्षण केले पाहिजे. परंतु, येथे उलट आहे. सदर अल्पवयीन मुलीला अमलीपदार्थ देण्यात आले होते. ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा आणून अत्याचार केले गेले. मागील दहा वर्ष खटला सुरु असताना आरोपी तपासात हवे तसे सहकार्य केलेले नाही, असे पीडितेच्या वकिलाने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details