महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली, दिल्लीसह हरियाणामध्ये 'हाय अलर्ट'ची शक्यता - high alert in haryana and delhi

शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हथनी कुंड धरणामधून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिल्ली आणि हरियाणाला सतर्कतेचा इशारा देण्याची शक्यता आहे.

यमुना नदी

By

Published : Aug 18, 2019, 3:21 PM IST

नवी दिल्ली - शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हथनी कुंड धरणामध्ये २ लाख ५७ हजार ९४७ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ७२ तासाच्या आत दिल्लीमध्येही 'हाय अलर्ट' जारी करण्याची शक्यता आहे.

नागरिकांना यमुना नदीपासून लांब राहण्याचे आवाहन

यमुना नदीचे उगमक्षेत्र असलेल्या यमुनोत्रीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिल्लीतही पूराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. हथनी कुंड धरणामध्ये पाणी सोडण्यात आल्यामुळे दिल्लीच्या नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हरियाणा- दिल्लीमध्ये हायअलर्ट

काही दिवसांपूर्वी हथनी कुंड धरणामध्ये १ लाख ४३ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे हरियाणा- दिल्ली येथे हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

इतरही राज्यांमध्ये पूराचे थैमान -

गुरुवारी यमुना नदीच्या पाणी पातळीची २०२.८६ मीटर इतकी नोंद करण्यात आली आहे. पुर्वेकडील राज्यांसह पश्चिम भागातील राज्यांनाही पूराचा फटका बसू शकतो. देशात पुरामुळे आत्तापर्यंत २०० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details