लखनऊ : बाबरी मशीद प्रकरणाच्या निकालानंतर उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पॅरा-मिलिट्री पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच, कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढण्यावर बंदी आणण्यात आली असून, राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
सीबीआयचे विशेष न्यायालय कैसरबागमध्ये आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कैसरबागमध्ये असलेले बसस्थानक बंद करण्यात आले होते. तसेच, कैसरबाग ते सीतापूर मार्ग आणि कैसरबाग ते अयोध्या मार्गावरील बस बंद करण्यात आल्या आहेत.