तिरुवअनंतपूर - जे नागरिक परदेशातून भारतात परतल्यानंतर आपण कोणकोणत्या देशात प्रवास केला याबाबतची माहिती लपून ठेवतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. प्रवासासंदर्भात माहिती लपवणे हा गुन्हा असल्याचे केरळच्या आरोग्य मंत्री के. के शैलजा यांनी स्पष्ट केले आहे. काल आणखी ६ कोरोनाग्रस्त सापडल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्यास सुरूवात केली आहे.
कोरोना: 'परदेशवारीची माहिती लपवणं गुन्हा, योग्य कारवाई करणार'
जर परदेशातून आलेल्या व्यक्तींनी आपली माहिती लपवली, तसेच आरोग्य विभागाला सुचना दिली नाही तर इतर नागरिकांना त्यांच्यापासून कोरोना होण्याचा धोका आहे, अशी माहिती लपवणाऱ्या प्रवाशांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे केरळच्या आरोग्य मंत्री यांनी स्पष्ट केले.
जर परदेशातून आलेल्या व्यक्तींनी आपली माहिती लपवली, तसेच आरोग्य विभागाला सुचना दिली नाही तर इतर नागरिकांना त्यांच्यापासून कोरोना होण्याचा धोका आहे, अशी माहिती लपवणाऱ्या प्रवाशांवर योग्य ती कारवाई केली जाईल. कोरोनाचा प्रसार जास्त झालेल्या देशांतून माघारी आल्यानंतर माहिती लपविल्यास त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
केरळमध्ये आत्तापर्यंत ९ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यसरकराने योग्य त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. बाधितांचे कुटुंबिय आणि संपर्कात आलेल्या नागरिकांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. राज्यभर कोरोनाचा प्रसार होण्याच्या भीतीने राज्याने लोकांमध्ये जनजागृतीही सुरू केली आहे.